विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! प्रथम वर्षाची परीक्षा महाविद्यालयातच; द्वितीय, अंतिम वर्षासह पदव्युत्तर पदवीसाठी सरमिसळ पद्धत; परीक्षा केंद्रांसह मागे बसलेल्या विद्यार्थ्यांमध्येही अदलाबदल

विद्यापीठाची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे बदलणार आहेत.
solapur
Exam esakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात होईल. पण, पदवीच्या द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसह पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विविध महाविद्यालयांमध्ये घेतली जाणार असून या परीक्षेसाठी एकामागे एक बसलेले विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे असणार आहेत.

विद्यापीठाची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे बदलणार आहेत, पण ग्रामीण भागात एखाद्या ठिकाणी परीक्षा केंद्र बदलण्यास अडचण निर्माण झाल्यास तेथील विद्यार्थी त्याच केंद्रावर परीक्षा देतील. मात्र, एक विद्यार्थी बी.ए.चा असेल तर मागील दुसरा विद्यार्थी बी.कॉम.चा असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे विद्यापीठाने ६ नोव्हेंबरपासून सुरु होणारी परीक्षा २० दिवस पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वाढीव वेळ मिळाला आहे. विद्यापीठाने परीक्षेची संपूर्ण तयार केली असून निवडणूक झाल्यानंतर लगेचच परीक्षेला सुरवात होणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालये असून विद्यापीठातील संकुलांसह सर्वच महाविद्यालयातील ६८ ते ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरु होईल. अभियांत्रिकीची परीक्षा साधारणत: ८ ते १० डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेचे नियोजन

पदवीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात होईल. पण, द्वितीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विविध केंद्रांवर घेतली जाईल. या परीक्षेत सरमिसळ पद्धत राहणार असून एकामागे एक बसलेले विद्यार्थी एकाच अभ्यासक्रमांचे नसतील.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सरमिसळ पद्धत नेमकी कशी?

परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना कॉपी करता येणार नाही याची खबरदारी सरमिसळ पद्धतीतून विद्यापीठाने घेतली आहे. पदवीच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी वगळता उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी एकमेकांच्या ओळखीचे नसतील. दुसरीकडे एकामागे एक विद्यार्थी त्याच अभ्यासक्रमांचे असल्यास ते पाहून उत्तरे सोडवू शकतात. त्यामुळे एकामागे एक बसलेले विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:लाच अभ्यास करून पेपर सोडवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.