विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचा ‘कॅरिऑन’चा निर्णय; एका संधीत गेलेल्या विषयांत व्हावे लागणार पास, अन्यथा प्रवेश रद्द

प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी द्वितीय वर्षात उत्तीर्ण झाले, पण पहिल्या वर्षीचे काही विषय मागे राहिल्याने आता तृतीय किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेता येत नाही. त्या सर्वांनाच आता विद्यापीठाने कॅरिऑनअंतर्गत एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
new education policy
new education policysakal
Updated on

सोलापूर : प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी द्वितीय वर्षात उत्तीर्ण झाले, पण पहिल्या वर्षीचे काही विषय मागे राहिल्याने त्यांना आता तृतीय किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेता येत नाही. त्या सर्वांनाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कॅरिऑनअंतर्गत एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या सत्र परीक्षेत त्या विद्यार्थ्यांना राहिलेले विषय काढावेच लागतील, अन्यथा तृतीय किंवा अंतिम वर्षातील त्यांचा प्रवेश रद्द होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार पहिल्या वर्षात काही विषय राहिले तरी त्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येतो. मात्र, पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विषयात उत्तीर्ण झाल्याशिवाय त्या विद्यार्थ्यांना तृतीय किंवा अंतिम वर्षाला प्रवेश मिळत नाही. मात्र, अनेक विद्यार्थी द्वितीय वर्षात उत्तीर्ण झालेले असतानाही त्यांना पहिल्या वर्षीचे काही विषय राहिल्याने अंतिम वर्षाला प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यासाठी कॅरीऑनची संधी द्यावी, अशी मागणी अनेकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे, कुलसचिव योगिरी घारे यांच्यासह विद्या परिषदेने विद्यार्थी हिताचा निर्णय घेत त्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला. आता त्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे, पण त्यांना या संधीत मागील विषयात उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे.

कॅरिऑनअंतर्गत विद्यार्थ्यांना एक संधी

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यातच थांबू नये म्हणून कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या विद्या परिषदेने त्या विद्यार्थ्यांसाठी कॅरिऑनची एक संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या अनुत्तीर्ण विषयांमध्ये उत्तीर्ण होण्याची एक संधी देण्याचा निर्णय झाला आहे. आगामी सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना त्या विषयात उत्तीर्ण व्हावेच लागेल.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

पीएच.डी.ची गुणवत्ता यादी ऑगस्टअखेर

विद्यापीठाने पीएच.डी.च्या ४७४ जागांसाठी नुकतीच ‘पेट’ घेतली आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर पाठविण्यात आला आहे. आता वेब बेस्ड परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येत आहे. त्यानंतर सर्वांची एकत्रित मेरिट यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार असून ३० गुणांची मौखिक चाचणी होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वर्षांची मुदत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.