Pankaja Munde: मुंडे बंधुभगिनी व्यासपीठावर एकत्र अन् पंकजांच्या कारखान्यावर GST विभागाचा छापा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा
Dhananjay Munde Vs Pankaja Munde
Dhananjay Munde Vs Pankaja Mundeesakal
Updated on

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. आज सकाळी १० वाजता GST चे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे.

केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता लगेच GST विभागाकडून ही कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात येतो. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Dhananjay Munde Vs Pankaja Munde
Dhananjay Munde: मुंडे बहिण-भाऊ एकत्र, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

तर पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगडावरील नारळी सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू हे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मात्र इकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.

Dhananjay Munde Vs Pankaja Munde
Vasant More: वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, म्हणाल्या...

धनंजय व माझ्यात भांडण लावले : पंकजा मुंडे

दोन दिवसांपूर्वी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या “धनंजय व माझ्यात काहींनी भांडण लावले. ते कशासाठी, हे माहीत नाही, मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करत आहे. मी खूप गरीब आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला चुकीचे सांगितलेले दिसत आहे. आमच्यात लढाया लावणाऱ्यांना काय साध्य करायचे आहे, ते मला माहीत नाही.”

Dhananjay Munde Vs Pankaja Munde
Shivsena: आदित्य ठाकरेंचं शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.