Rajyasabha Elections : डमी मतपत्रिकेतून ‘मविआ’च्या आमदारांना मार्गदर्शन

NCP, Shivsena
Mahavikas Aaghadi
NCP, Shivsena Mahavikas AaghadiSakal
Updated on

मुंबई : राज्यसभेची निवडणूक शुक्रवारी (ता. १०) होऊ घातली आहे. विजयासाठी मागील काही दिवसांपासून सर्व पक्ष प्रयत्न करीत आहे. आपला एकही मत फुटू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नाही आहे. यामुळे महाविकास आघाडीचे दोन मत वाया गेले. आता आणखी नुकसान होऊ नये म्हणून ‘मविआ’ने (mahavikas aaghadi) डमी मतपत्रिकेतून (dummy ballot papers) आमदारांना मार्गदर्शन (Guidance) केले.

सुरुवातीला ही निवडणूक सोपी होईल असे वाटत होते. मात्र, भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवार उभा केल्याने चुरस आणखी वाढली. तसेच सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली. आपलाच उमेदवार विजयी होईल अशी भविष्यवाणी सर्वजण करीत आहे. विजयासाठी एक एक मत महत्त्वाचे झाले आहे. तसेच अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचे वजन वाढले आहे.

NCP, Shivsena
Mahavikas Aaghadi
सुरजेवालांची जीभ घसरली; म्हणाले, सीता मातेचे जसे चीरहरण झाले...

निवडणुकीपूर्वी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने आमदारांना डमी मतपत्रिकेतून मार्गदर्शन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. डमी मतपत्रिकेतून (dummy ballot papers) पक्षाने सांगितलेल्या उमेदवाराला पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मत द्यायची आहेत. यासाठी नावापुढे एक किंवा दोन असे लिहायचे आहे. याबाबत मार्गदर्शन (Guidance) करण्यात आले.

निवडणुकीत पेन महत्त्वाचा

राज्यसभा निवडणुकीत पेनला महत्त्व आहे. मतदानाच्या वेळी जे पेन ठेवले जाते तेच पेन सर्व आमदारांना वापरावे लागते. आमदारांनाही पेन कुणी बदलला नाही ना हे पाहावे लागेल. पेन एकच असेल तर त्याची शाई बदलली का? हे पाहावे लागते. अन्यथा मत बाद होण्याची शक्यता जास्त असते, असे राज्यसभा निवडणूक घेतलेले आणि दिल्ली विधानसभेचे माजी सचिव एस के शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.