Gujarat,Himachal Pradesh Election 2022: बहुचर्चित गुजरात विधानसभा आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन केलं. तर गुजरातमध्ये भाजपने सत्ता कायम राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. गेल्या २४ वर्षांत गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्व विक्रम भाजपानं मोडलं आहेत.
या निवडणुकीत जनतेनं भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर लावली. त्यामुळे देशातील काँग्रेसची पिचेहाट झाली आहे. मात्र गुजरात निवडणुत मोदींची लाट अजून दिसून आली. दरम्यान या विजया मागे महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकाने मोठी मदत गुजरातला केली अशी चर्चा चालू झाली. त्याला कारण ठरलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक ट्विट.
हेही वाचा: Gujarat Election Result 2022: गुजरात निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..."
हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'गुजरातच्या विजयाचे खूप मोठे श्रेय महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीसांना जाते. कारण एवढी मदत कोणीही केली नसती. स्वतःच्या राज्यातील उद्योग गुजरातला देणे म्हणजे यांच महाराष्ट्रावर किती प्रेम असेल?' त्यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रतील वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn Project) प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणार होता.
या प्रकल्पातून सुमारे १ लाख २० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुमारे १ लाख ५४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प पिंपरी चिंचवड जवळच्या तळेगाव येथे होणार होता. मात्र हा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला जावू दिला अशी चर्चा महाराष्ट्रभर झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.