आज जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपाचा विजय निश्चित झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय मिळवला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून भाजपचं अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांनी यावेळी भाजपवर खोचक टीका केली आहे.
रोहित पवार यांनी गुजरातमधील विजयानंतर खोचक शब्दात टीका केली आहे. तसेच त्यांनी हिमाचल प्रदेश येथे कॉंग्रेस आणि दिल्ली महानगरपालिकेत भाजपला हरवून विजयी झालेल्या 'आप'चे देखील अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या युवांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून तेच स्वप्न गुजरातच्या युवांना दाखवत स्वतःचं सत्तेचं स्वप्न साकारणाऱ्या भाजपाचं ‘हार्दिक’ अभिनंदन तर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला नमवत विजयी झालेल्या काँग्रेस आणि आपचंही मनःपूर्वक अभिनंदन!"
हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
पुढे रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रचारावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "गुजरातचा निकाल म्हणजे PM साहेबांच्या ३१ व गृहमंत्र्यांच्या ३८ सभा तर डझनभर केंद्रीयमंत्री व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकून केलेल्या प्रचाराचं फलित आहे. शिवाय मोठ्या मनाने स्वतःचे प्रकल्प गुजरातला देऊन शेजारधर्म निभावणाऱ्या महाराष्ट्र शासनाचंही योगदान विसरता येणार नाही." या सोबत रोहित पवार यांनी यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपचे अरविंद केजरीवार यांचे फोटो देखील शेअर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.