Gujarat GST Commissioner Chandrakant Valvi
Gujarat GST Commissioner Chandrakant ValviEsakal

GST Commissioner Gujarat: महाबळेश्वरमध्ये आख्खं गाव विकत घेणाऱ्या गुजरातच्या अधिकाऱ्यावर कारवाईला सुरुवात

Chandrakant Valvi Mahabaleshwar: काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात मोठा खळबळ उडाली होती. तसेच या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
Published on

सध्या अहमदाबादमध्ये कार्यरत असलेले गुजरातचे जीएसटी कमिशनर चंद्रकांत वळवी यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कांदाटी व्हॅलीमधील संपूर्ण गावात सुमारे 600 एकर जमीन खरेदी केली आहे.

नंदुरबारचे रहिवासी आणि सध्या गुजरातचे जीएसटी मुख्य आयुक्त असलेले चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांसह महाबळेश्वरजवळील झडणी गावातील संपूर्ण जमीन खरेदी केली आहे.

काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात मोठा खळबळ उडाली होती. तसेच या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

दरम्यान या प्रकरणात आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) स्वतःहून दखल घेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना नोटीस बजावत नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरण लक्षात घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

एनजीटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर येथे सुरू झालेल्या कामांचे परिसरावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. जैवविविधता धोक्यात येण्याबरोबरच पाणी आणि हवाही प्रदूषित होत आहे. बेकायदेशीर बांधकामे, खोदकाम, झाडे तोडणे, बेकायदेशीरपणे बांधलेले रस्ते, वनक्षेत्रातून होणारा पाणीपुरवठा यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे.

Gujarat GST Commissioner Chandrakant Valvi
EWS: मराठा विद्यार्थांना आता EWS मधून अर्ज करता येणार नाही! आयोगाने काढले नोटिफिकेशन, सदावर्तेंचा दावा

एनजीटीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे महाराष्ट्रातील प्रादेशिक अधिकारी, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

Gujarat GST Commissioner Chandrakant Valvi
BJP Meeting: महायुती की स्वबळावर? भाजपच्या बैठकीत काय निर्णय होणार? निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढल्या

या अधिकाऱ्याने घेतलेल्या जमिनींवर सध्या अंतर्गत भागात अनधिकृत बांधकामे, खोदकाम, झाडे तोडणे, बेकायदेशीर रस्ते, जंगलाच्या हद्दीतून होणारा वीजपुरवठा यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

या परिसरात गेल्या ३ वर्षांपासून बेकायदेशीर बांधकामे, मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनातील एकाही घटकाला याचा थांगपत्ता लागलेला नाही. यावरून एकही सरकारी अधिकारी तपासाला येत नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.