Gujarat Assembly Elections 2022: गुजरात निवडणुकीसाठी काल दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल, अशी दाट शक्यता आहे.
दुसरीकडे काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळणार असं दाखवण्यात आलेलं असलं तरी भाजप आणि काँग्रेसमध्ये शंभरपेक्षा जास्त जागांचा फरक आहे. २०१७ मध्ये काँग्रेसने जेवढ्या जागा जिंकल्या तेवढ्याही यावेळी जिंकता येतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय.
हेही वाचाः शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
महत्त्वाचं म्हणजे देशभरातमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु आहे. मात्र जिथे निवडणुका आहेत तिथे ही यात्रा गेली नाही. गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका असूनही तिथे यात्रेचं नियोजन काँग्रेस नेतृत्वाने का केलं नाही? असा प्रश्न उपस्थित होतय.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली. या मुद्द्यासह महागाई, हिंसा या मुद्द्यांवर काँग्रेसला ताकद लावता आली असती. परंतु काँग्रसेला ही खेळी खेळता आलेली नाही. भारत जोडो यात्रेनेही मोठा फरक पडू शकला असता. मात्र काँग्रेसनेच भाजपला 'बाय' दिल्याचं दिसून येत आहे.
मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांना काँग्रेसने फारस गांभिर्याने घेतल्याचं दिसून आलेलं नव्हतं. मोठे नेते फार अॅक्टिव्ह दिसले नाहीत. गुजरातमध्ये राहुल गांधींच्या केवळ तीन रॅली झाल्या तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केवळ दोन दिवस गुजरातसाठी दिलेले. हिमाचल प्रदेशमध्ये प्रियंका गांधी गेल्या मात्र राहुल गांधी गेले नाहीत. भाजप आणि आप ज्या पद्धतीने निवडणुका लढवत आहेत, तसे प्रयत्न काँग्रेसकडून झाले नाही, हे स्पष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.