उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे मंत्री गुलबराव पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत यानंतर पक्ष बुडवणार अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा ही सध्या जळगाव येथे आहे, दरम्यान जळगावमध्ये अंधारे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तर दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी पाठवलं आहे असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, अशा लोकांची महाप्रबोधन यात्रा नसून, हे जे प्रॉडक्ट आलं आहे, ते राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. त्याचप्रमाणे उरल्या-सुरलेल्या शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी हे नवीन पार्सल राष्ट्रवादीकडून इकडं आलेलं आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मुक्ताईनगरला चंद्राकांत पाटील आणि माझी संध्याकाळी सात वाजता सभा होती आणि त्यांची देखील सभा होती. जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. तसेच ५० मिटरच्या आता दोघांना परवानगी असल्याने जिल्हाधिकारी आणि एसपींनी विनंती केली की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणं आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही परवानगी नाकारत आहोत.
गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, कोणी आमच्या समाजावर बोलून तेढ निर्माण करत असेल, तर पालकमंत्री म्हणून ते थांबवण्याची जबाबदारी माझी आहे. मी त्यांनी (प्रशासनाने) दिलेल्या सुचनेनुसार आम्ही सभा घेणार नाही असा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांनी दोघांचीही परवानगी नाकारली आहे असे त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान आज शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे मुक्ताईनगरात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत सभा होती. दरम्यान सुषमा अंधारे यांची सभा आणि शिंदे गटाचा कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्याता होती. दरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पहाता प्रशासनाने दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.