Gulabrao Patil: अजितदादा आल्याने गद्दार शब्दाचा वापर बंद झाला; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला टोला

Gulabrao Patil
Gulabrao Patil
Updated on

Gulabrao Patil:  महायुतीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप यांची मुंबईत बैठक सुरू आहे. लोकसभ निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महायुतीने कंबर कसली आहे. या बैठकीत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.

गुलाबराव पाटील, सरकारला तिसरं इंजिन जोडलं गेलं. अजितदादा आल्यामुळे गद्दार, खोके बंद झाले. आम्ही घराच्या बाहेर निघालो की सगळे गद्दार, खोके म्हणायचे पण अजितदादा तुमची राष्ट्रवादीत काय दहशत आहे. राष्ट्रवादीवाले तुम्हाला कोणीही गद्दार म्हणत नाही.

गुलाबराव पाटील म्हणाले, २०२४ मध्ये भगवा फडकणार आहे. आज महायुतीचा संकल्प हाच आहे की २०२४ मध्ये ४८ जागा निवडून आणायच्या आहेत. दादा आम्ही कार्यकर्ते म्हणून जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु पण आमच्यावेळेस लफडं नको व्हायला. अडचण तेव्हाच होते. वरते मोदीसाहेब म्हटलं की कोणीही मतदान करते. शिंदे साहेब आगे बढो, फडणवीससाहेब आगे बढो, दादा एकच वादा आता असं म्हणायचं नाही. आता महायुती आगे बढो असं म्हणायचं. ही आता गरज आहे.

Gulabrao Patil
INDIA Alliance Meeting Mumbai : इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे 4 ठराव; आघाडीच्या एकसंधतेसाठी...

भाजप विरोधात कमी लढलो. पण राष्ट्रवादी विरोधात आयुष्यभर लढलो आता सांभाळून घ्या. तुमची घड्याळ आमच्याबरोबर चालली पाहीजे. या तीन जणांच्या सरकारमध्ये ४८ जागांचा संकल्प आहे. कार्यकर्ते म्हणून प्रामाणिकपणे कामे केली तर यश नक्की मिळेल. आयुष्यभर हे काम केलं आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. (latest marathi news)

गुलाबराव पाटील यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केली. आपल्याला जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, असे ते म्हणाले.

Gulabrao Patil
Sushma Andhare : ...तर मग तुम्ही गुवाहाटीला चारधाम करायला गेला होतात का? अंधारेंचा शिंदे गटाला सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.