Shivsena : …माझा ३३वा नंबर होता; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patil esakal
Updated on

सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. यादरम्यान नेहमी चर्चेत असणारे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागं नेमकं काय कारण होतं याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

पाटील म्हणाले की, लोकं आम्हांला गद्दारी केली, गद्दारी केली असे म्हणतात..ण माझा ३३ वा नंबर होता. माझ्या आधी ३२ जण गेले होते. आता माझ्या जागी तुम्ही बसा, जळगाव जिल्ह्यात पाच आमदार होते. पाचमध्ये चार माझ्या आधी पळून गेले. मी एकटा राहिलो.

मी आजूबाजूला नजर मारली. तर नागपूरकडे त्या ठिकाणचाही आमदार गेला, बुलडाण्यांचाही गेला. नाशिक,,ठाणे आणि दादरचाही आमदार गेला. नागपूर ते मुंबई मी एकटा राहिलो, मी काय करणार होतो, जर मी गेलो नसतो तर एवढा विकास झाला असता का? असेही त्यांनी म्हटलं.

Minister Gulabrao Patil
Monsoon Update : यंदा मुंबईत 'या' तारखेला येणार मान्सून! उष्णतेपासून दिलासा कधी? तज्ज्ञांनी दिली माहिती

चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग माझ्यावरती झाडी डोंगर खोके अशा जहीरी टीका झाली. पण मी जर चुकीचा निर्णय घेतला असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एवढी कामे आपल्या मतदारसंघात झाली नसती असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Minister Gulabrao Patil
Pune News : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्या; सात मुलींना वाचविण्यात यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.