Sadavarte : ''आम्ही भाकरी फिरवत नाही, फोडणी देतो.. म्हणून पवारांच्या संघटनेचा पराभव'', सदावर्ते म्हणाले...

एसटी बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंचा डंका
Gunratn Sadavarte
Gunratn Sadavarte esakal
Updated on

मुंबईः एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी साडेपाच महीने चाललेल्या संपाचा प्रभाव एसटी बँकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. १९ संचालक पदासाठी झालेल्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघंटनेचा पराभव करत, गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकहाती स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

या निवडणूकीची मतमोजणी रविवारी सकाळी ९ वाजता सुरू झाली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी ५ वाजता निवडणूकीचे अंतीम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषीत केले आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या पाच प्रवर्गातील १९ संचालकांसाठी ही निवडणूक पार पडली आहे. ज्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये १४, महिला प्रतिनीधी म्हणून २, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनीधी १, इतर मागास प्रतिनीधी १, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनीधी १ असे एकूण १९ संचालक पदी सदावर्ते पॅनलचे उमेदवार निवडूण आले आहे.

Gunratn Sadavarte
World Cup Qualifier: झिम्बाब्वेनं जिंकलं! 'वन डे'त दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक धाव फरकानं जिंकला सामना

एसटी महामंडळात प्रस्थापित असलेल्या आणि गेल्या अनेक दशकांपासून काम करणाऱ्या सर्व कामगार संघंटनांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र एसटी कामगार संघंटना, तिसऱ्या क्रमांवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची सेवा शक्ती संघंर्ष संघटंना तर चौथ्या क्रमांकावर एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), पाचव्या क्रमांकावर उबाठा (शिवसेना) - भाई जगताप यांची काँग्रेस - कास्ट्राईब यांच्या युतीचे पॅनल, सहाव्य़ा क्रमांकावर अपक्षांचे पॅनल आणि सातव्या क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेला समाधान मानावे लागले आहे.

Gunratn Sadavarte
Mumbai : टाऊनशिपसाठी मुद्रांक शुल्क माफीला विरोध! एका बांधकाम व्यावसायिकासाठी निर्णय घेतल्याचा आरोप

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मंचावरूनच गोडसेंचा जयघोष

एसटी बँकेच्या निवडणूकीच्या अंतीम निकाल घोषीत करतांना उमेदवारांचे प्रमाणपत्र स्विकारतांना अॅड.जयश्री पाटील आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या उमेदवारांकडून नथुराम गोडसेचा जयघोष करण्यात आला. तर दुसरीकडे विजयानंतर काढण्यात आलेल्या विजयी रॅलीमध्ये सुद्धा गोडसेचे पोस्टर झळकवण्यात आले. यात निवडणूक अधिकाऱ्यांपुढेच त्यांच्या मंचावरून अशा घोषणाबाजी केल्याने निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग झाला का ? या दिशेने निवडणूक निर्णय अधिकारी यावर चौकशी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कष्टकरी विरूद्ध सावकारी लढा होता. हा वैचारीक लढा याअर्थाने स्वतंत्रवीर सावरकर, नथुराम गोडसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चर्चा व्हावी यासाठी होती. अखंड भारताच्या विचारातून या निवडणुकीची चर्चा व्हावी, ही निवडणूक सामान्य कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी होती. शरद पवारांच्या काळात ड्रायव्हर, कंडक्टर, मॅकेनिकल यांच्या हातात कधीच सत्ता नव्हती. भाकरी फिरवा फिरवी करायची नसते, भाकरी खायला असते. आम्ही भाकरी फिरवत नाही फोडणी देतो. त्यामुळे पवारांच्या कामगार संघंटनेचा पराभव करून आम्ही विजय मिळवला आहे, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते (एसटी कष्टकरी जनसंघं) यांनी दिली.

कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांसाठी अनेक धोरणात्मक निर्णयासोबतच त्यांची असंख्य कामे केलेली आहेत. आमच्या प्रामाणिक प्रयत्नातून त्यांचे समाधान झालेले निकालातून दिसून येत नाही. जय पराजय हा निवडणूकीचा भाग असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात बळ मिळणे ही शोकांतिका आहे. जुमलेबाज आणि फसव्या लोकांना मिळालेला विजय भविष्यात कामगारांना घातक ठरू नये, हिच अपेक्षा.

हिरेन रेडकर, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कामगार सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.