Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना धक्का! एसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल

गैरहजर असलेले सर्वजण सदावर्तेंच्या विरोधात गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte sakal
Updated on

नवी दिल्ली : एसटी कर्मचारी सहकारी बँकेचे १४ संचालक कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळं गुणरत्न सदावर्ते यांना धक्का बसला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत १९ पैकी केवळ ५ संचालक हजर होते. गैरहजर असलेले सर्वजण सदावर्तेंच्या विरोधात गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. (Gunratn Sadavarte shocked 14 Directors out of 19 of ST Employees Bank Maharashtra Not Reachable)

Gunaratna Sadavarte
Sanjay Raut: 'पिक्चर अभी बाकी है'! फोटोनंतर आता मकाऊतल्या कसिनोचा व्हिडिओ राऊतांनी केला ट्विट

दोन दिवसांत घेणार पत्रकार परिषद

टीव्ही ९ च्या वृत्तानुसार, एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत जे १४ संचालक गैरहजर होते ते दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही यात म्हटलं आहे. एसटी कर्मचारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांनी एकहाती सत्ता काबीज केली होती. तिथंच आता सदावर्ते यांना धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

Gunaratna Sadavarte
Eknath Shinde: 'हिंदू हृदयसम्राट एकनाथ शिंदे' उल्लेखावरुन राजकारण पेटलं; ठाकरे गट आक्रमक

पाच संचालक बाजूनं

गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यपद्धतीवर संचालक नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच १४ संचालक नॉटरिचेबल झाले आहेत तर केवळ ५ संचालकच सदावर्तेंच्या बाजूनं आहेत. त्यामुळं सदावर्ते यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

Gunaratna Sadavarte
भारताचं मोठं यश! 'त्या' 8 नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेचा कतार कोर्ट करणार पुनर्विचार

एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांचा लढा लढला होता. (Latest Marathi News)

एसटी महामंडळाचं सरकारी सेवेत विलिनिकरण व्हावं अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. पण सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणं पगार आणि भत्ते तसेच सुविधा देण्याचं सरकारनं मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. पण यामुळं सदावर्ते यांना चांगलंच बळ मिळालं.

Gunaratna Sadavarte
Sanjay Raut: 'पिक्चर अभी बाकी है'! फोटोनंतर आता मकाऊतल्या कसिनोचा व्हिडिओ राऊतांनी केला ट्विट

पॅनलंनं मिळवला मोठा विजय

यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अर्थात एसटी कर्मचारी संघटनेच्या बँकेच्या निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघ नावानं पॅनेल उभं केलं होतं. या पॅनेलनं सर्व १९ जागांवर विजय मिळत सदावर्तेंना मोठा विजय मिळवून दिला होता. यामध्ये संदीप शिंदे यांच्या एसटी कामगार संघटनेच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.