मोठी बातमी! सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
Gunratn Sadavarte
Gunratn SadavarteSakal Digital
Updated on

मुंबई (Gunratna Sadavarte ST Protest Case Update) : ‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासात नवीन माहिती उघड झाल्याने सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. तर दुसरीकडे पोलीस तपासात नवीन माहिती काहीच नाही. तपास भरकवटला जातोय, असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली.

‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी सदावर्तेंना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई पोलिसांच्या वतीने प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. घरत यांनी न्यायालयात आंदोलनासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोमधून पैसे गोळा केले, घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. अशा व्यवहारांचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती घरत यांनी कोर्टात दिली. दोन्ही बाजूंची युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Gunratn Sadavarte
मोठी बातमी : नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

प्रकरण नेमके काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी (ता. ८) पोलिसांनी अटक केली होती, तर शेकडो एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी विविध कलमांतर्गत सदावर्ते आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी उच्च न्यायालयाने एसटी आंदोलनाबाबत अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर झालेल्या सभेत सदावर्ते यांनी पवार यांच्या घरात शिरण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रेरित होऊन काही कर्मचाऱ्यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन आंदोलन केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी साताऱ्यातील फलटण मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सातारा पोलिस सदावर्ते यांच्या अटकेच्या तयारीत आहेत. सातारा पोलिस दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असल्याचं समजतंय.

सदावर्ते यांना जर सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांना सातारा पोलिस ताब्यात घेऊ शकतात पण या पूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचं समजतंय. आता सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सातारा पोलीस त्यांचा ताबा घेणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Gunratn Sadavarte
उत्तर प्रदेश : नदीत बोट उलटून दहा महिला बुडाल्या; तीन तरुणींचा मृत्यू

सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी आंदोलकांच्या भावना भडकवल्याचा आरोप होता. हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते यांना काही फोन आले होते आणि त्यांनी आंदोलकांकडून पैसे उकळल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर सदावर्तेंना काळं फासणाऱ्यांसाठी भाजपाकडून पन्नास हजाराचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()