सदावर्तेंना धक्काबुक्की, मेटेंच्या अंत्यदर्शनाला पोहचले होते काळ्या कपड्यात

Gunratna Sadavarte attacked during Vinayak Mete final tribute of maharashtra politics
Gunratna Sadavarte attacked during Vinayak Mete final tribute of maharashtra politics
Updated on

आज शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते विनायक मेटे यांंचे आज रस्ता अपघातात निधन झाले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदरवर्ते हे विनायक मेटे यांच्या अंत्यदर्शनासाठी काळ्या कपड्यात आल्याने त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. वकील सदावर्ते हे न्यायालयात कायम मराठा विरोधी भूमिका घेत आले आहेत. मेटे यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

विनायक मेटे यांनी आयुष्यभर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी लढा दिला आहे, तर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयाच याचीका दाखल केल्या होत्या, सदावर्ते यांनी त्यांच्या भाषणातून देखील मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. दरम्यान विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राज्याती अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मेटेंच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले. दरम्यान, मेटे यांच्य पार्थिवावर सोमवारी (१५ ऑगस्ट) बीड जिल्ह्यातील उत्तमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Gunratna Sadavarte attacked during Vinayak Mete final tribute of maharashtra politics
Vinayak Mete : मेटे ज्या कारमधून प्रवास करत होते, ती किती सुरक्षित? जाणून घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी विनायक मेटे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पोलिसांची आठ पथकं नेमण्यात आली आहेत. तर दुसरीकडे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.