Gunratna Sadavarte : मोठ्याने बोलू नका तुम्ही प्रेससमोर नाहीत; हायकोर्टाने सदावर्तेंना फटकारलं

Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte google
Updated on

मुंबई - एसटी कामगारांचे नेते म्हणून परिचीत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची सनद बार कौन्सिलने काही दिवसांपूर्वीच दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. त्याविरोधात सदावर्ते उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र न्यायालयाने त्यांनी फटकारल्याचं समोर आलं आहे. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.

Gunratna Sadavarte
Roshni Shinde Beating Case: 'रोशनी शिंदे मारहाण प्रकरण ही स्टंटबाजी', भावना गवळींनी घेतली अमित शहांची भेट

हायकोर्टाने सदावर्ते यांना खडसावताना म्हटलं की, तुम्ही प्रेससमोर नाहीत, तर कोर्टात दाद मागायला आलात याचं भान राखा. सदावर्ते यांची भाषा आक्रमक आणि आवाज मोठा होता. त्यामुळे न्यायमूर्ती पटेल यांनी त्यांनी दोन वेळा समज दिली.

मीडिया आणि प्रेस माझी बदनामी करत आहेत. असं सदवर्ते यांनी न्यायालयात म्हटलं. तसेच सनद दोन वर्षांसाठी रद्द झाल्याने त्याची दादत सदावर्ते यांनी न्यायालयात मागितली.

गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द करण्यात आली आहे. वकिली करताना त्यांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे. एसटी आंदोलनाच्या वेळी त्यांनी वकिलांचा पोशाख परिधान करून आझाद मैदानात डान्स केल्याने ते अडचणीत सापडले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच निलंबनाविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले असून तिथं न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.

Gunratna Sadavarte
Roshni Shinde Beating Case: रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, अखेर पोलीस आयुक्तांचा अहवाल सादर

बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संघटनेने सदावर्तेंवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्या अंतर्गत सदावर्ते यांना दोन वर्षे वकिली करण्यास मज्जाव कऱण्यात आला आहे. वकिलांसाठी असलेल्या नियमांचं त्यांनी उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.