Manoj Jarange: नावासोबत पाटील लावता, मग आरक्षण कशाला हवं? गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना सवाल

gunratna sadawarte criticize manoj jarange patil
gunratna sadawarte criticize manoj jarange patil
Updated on

मुंबई- जातीवर आधारित सभांना आम्ही समर्थन देत नाही. हा देशासाठी मोठा धोका असतो. त्यामुळे मनोज जरांगेंच्या सभांना केवळ मी एका जत्रेसारखं पाहतो. याठिकाणी लोक येतात आणि मौजमजा करुन निघून जातात. त्याप्रकारे त्याठिकाणी काही वैचारिक घडलं नाही. त्यांचे बोलणं मग्रुरी आणि माजोरीपणाचं होतं. यावरुन त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

काहीतरी मृगजळ दाखवून लोकांना एकत्र आणून गलिच्छ राजकारण केलं जातंय. हे राजकारण शरद पवार हेच करत आहेत. त्यांचाच मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे. माझ्या 'एक मराठा लाख मराठा' घोषणेवर टीका त्यांनी केली. पण, ही घोषणा जातीवाचक नाही. ही गोष्ट सैन्यातील आहेत. त्यामुळे ते काहीही बोलत होते. बरगळत होते, असा हल्लाोबोल त्यांनी केला.

gunratna sadawarte criticize manoj jarange patil
Monoj Jarange Sabha : सरकारकडे फक्त १० दिवस उरलेत, अन्यथा...; अंतरवलीत मनोज जरांगे गरजले!

त्यांनी अत्याचाराची भाषा केली. पोलिसांना धमकी दिली. आम्ही तक्रार आणि नोटीस रितसर दिली आहे. गुन्हे जे यांनी मागच्यावेळी केले आहेत. बसेस जाळल्या, यांच्याकडून वसुली करण्यात येईल. जो समाज कायम राज्यकर्ता आहे. हा समाज सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारला आहे. त्यामुळे आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असते, असं सदावर्ते म्हणाले.

आज सुद्धा जरांगे स्वत:ला पाटील म्हणतात. पाटीलकी कोणाकडे असते. उच्च वर्गासाठी पाटीलकी असते. त्यामुळे आरक्षण उच्च वर्गासाठी नसते. जरांगेंचे राजकीय बॉस वेगळेच आहेत. शरद पवार त्यांच्या पाठिशी आहेत. जरांगे पाटील यांना काही ज्ञान नाही. संविधानाचं ज्ञान नाही. काही आकलन नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षणाचा आम्हाला आदर आहे, असं ते म्हणाले.

gunratna sadawarte criticize manoj jarange patil
Manoj Jarange: "जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले गुणरत्न सदावर्ते"; मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

स्वत:ला मराठा म्हणता मग ओबीसींमधून आरक्षण कशाला मागता. परिस्थिती कळाली पाहिजे. तुमच्याच बोलण्यातून ते फेल झालं आहे. सारथीला बजेट सुद्धा देता येत नाही. कारण उन्नत समाजला निधी देता येत नाही. मागास समाजासा निधी देता जात नसून सारथीला निधी दिला जात आहे. यात काही विरोधाभास आहे, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.