H3N2 Virus : राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. यामध्ये मास्कसक्ती विषयीचाही निर्णय होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातच नव्हे, तर देशभरात H3N2 चा संसर्ग वाढताना दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यातल्या पहिल्या १५ दिवसांमध्ये मुंबईत या विषाणूचे ५३ रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यातला एक रुग्ण अहमदनगरचा तर दुसरा नागपूर इथला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मास्कसक्तीबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
आपण राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत, अशी माहितीही सावंत यांनी दिली आहे. तसंच आजार अंगावर काढू नका, खबरदारी घ्या, मास्क वापरा, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.