Chitra Wagh : ...तर त्या हरामखोरांना भर चौकात फाशी द्या; चित्रा वाघ संतापल्या

Chitra Wagh
Chitra Waghsakal
Updated on

जळगाव : मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या हरामखोराना भर चौकात फाशी शिक्षा द्यायला पाहिजे असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून ही त्याला फाशीची शिक्षा मिळेल असा विश्वास भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

Chitra Wagh
Raj-Uddhav Thackeray Meeting: "तिसऱ्याने यामध्ये पडू नये" राज-उद्धव एकत्र येण्यावर मोठी प्रतिक्रिया!

अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची आज सांत्वनपर भेट घेतली.

मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्याला सोडले जाणार नाही असे आश्वासन यावेळी चित्रा वाघ यांनी दिले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीडित परिवारासाठी दिलेली आर्थिक मदत परिवाराच्या स्वाधीन केली.

Chitra Wagh
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना झटका! सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली, FIR होणार दाखल

भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शासन, पोलिसयंत्रनेने सोबत सामान्यांनीही सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. जे आपल्याकडे कायदे आहेत, ते महिलांच्या सुरक्षेसाठी सशक्त आहे. फक्त या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. केवळ कायदे करून होणार नाही, अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

आश्रमांमधील घटनाबद्दल मागणी केली होती की, आश्रमशाळांची सरसकट ऑडीट करण्याची मागणी आम्ही केली होती. त्याचं काम सुरू आहे. त्याचे अहवाल लवकरच येतील, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()