Rohit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून आनंदच, पण...; रोहित पवारांनी व्यक्त केली भीती

Rohit Pawar
Rohit Pawar
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी वेगळा गट स्थापन केला. तर रोहित पवार हे शरद पवार गटात आहेत. मात्र सोमवारी कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीच्या मुद्दावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार आमने-सामने आले होते. त्यानंतर आज रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं.

Rohit Pawar
Jayant Patil : अजित पवारांकडून मिळाला सर्वाधिक निधी? जयंत पाटील स्पष्टच बोलले...

रोहित पवार म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मला आनंदच आहे, पण त्यांचे आमदार करत असलेल्या ट्विट आणि पोस्टरमुळेच दादा अडचणीत येतील. तसेच राज्य आणि देशातील भाजप नेत्यांना त्यांच्या पक्षातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे पक्ष फोडणे घर फोडणे सुरू असल्याची टीकाही रोहित पवार यांनी भाजपवर केली.

Rohit Pawar
Rain News : मुसळधार पावसामुळे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्याखाली !

यावेळी रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या टोलनाका तोडफोडीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अमित ठाकरे यांची वेगळी स्टाईल आहे. त्यांनी अशा गोष्टींच समर्थन कस केलं ते मला माहित नाही. तोडफोड करणे ही जुनी पद्धत होती पण आता हे करण चुकीच, असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.