Happy Birthday Uddhav Thackeray:...राजकारणात आले लगेच राज-उद्धव वादाची पहिली ठिणगी पडली!

नुकतंच उद्धव हा विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही', असं विधान राज ठाकरेंनी एका मुलाखतीत केलं होतं.
raj thackeray uddhav thackeray
raj thackeray uddhav thackerayesakal
Updated on

बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सेनेला मोठा धक्का बसला. विठ्ठल नव्हे तर त्याच्यासोबतच्या बडव्यांमुळे आपण शिवसेनेतून बाहेर पडतोय, असं सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेतून एक्झिट घेतली. तेव्हापासून राज आणि उद्धव यांच्यातला वाद धगधगत आहेच.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी पुढे जाऊन आपला नवा पक्ष स्थापन केला, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राज ठाकरे यांनी सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करणं सुरूच ठेवलं. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं. उद्धव ठाकरे हा विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही. त्याला सर्वात जास्त जवळून मीच ओळखतो, असं राज ठाकरे म्हणाले होते.

आजही उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे बरोबर युती होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. ठाकरे बंधु एकत्र येणार नाहीत हे तरी निश्चित आहे पण या दोन भावांच्यात वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली, कुठून दोघांच्यातली धगधग सुरू झाली, जाणून घ्या उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त...

raj thackeray uddhav thackeray
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका; म्हणाले, हा माणूस...

डिसेंबर १९९१ मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इमारतीवर बेरोजगारांचा एक मोर्चा आयोजित केला होता. तेव्हा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं. तेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. या मोर्चाला खूप जोरदार प्रतिसाद मिळाला होता. यासाठी राज ठाकरेंनी खूप प्रयत्न केले होते, संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं.

नागपूरचा हा मोर्चा भव्यदिव्य होणार याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली होती. त्या रात्री राज ठाकरेंना थेट मातोश्रीवरुन फोन आला. मोर्चामध्ये "उद्धवलाही भाषणाची संधी द्या". झालं, इथंच राज आणि उद्धव वादाची ठिणगी पडली. राज ठाकरेंना (Raj Thackeray) वाटलं की उद्धव ठाकरे आपलं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत आणि ते नाराज झाले.

raj thackeray uddhav thackeray
शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

दुसऱ्या दिवशी एका ट्रकवर लाकडी फळ्यांच्या साहाय्याने व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. त्यावर शिवसेनेचे मान्यवर बसले होते. त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी घोषणा केली की, आता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) भाषण करतील. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी ५० हजारांहून अधिकांच्या जमावापुढे आपलं पहिलंवहिलं जाहीर भाषण केलं. पण यामुळे राज ठाकरे मात्र दुखावले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.