Harihareshwar Boat : मस्कतवरुन युरोपला निघालेलं दाम्पत्य; दोन महिन्यांपूर्वी इंजिन बंद पडल्याने भरकटलेली बोट

देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने तटरक्षक दल, दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर विभाग, नौसेना, कस्टम, सागरी सुरक्षा पोलिस दल यांनी याचा कसून तपास केला.
Harihareshwar Boat the boat lost its way due to engine failure AK-56 rifles mumbai
Harihareshwar Boat the boat lost its way due to engine failure AK-56 rifles mumbaisakal
Updated on

अलिबाग : हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर शस्त्रसाठ्यासह आढळलेल्या ‘लेडी हॅन’ या विदेशी नौकेचा तपास पूर्ण झाला आहे. यात घातपाताचा कोणताही हेतू नसल्याचा निर्वाळा रायगड पोलिसांनी दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी ही बोट ओमानजवळच्या समुद्रातून इंजिन बंद पडल्याने भरकटली होती. त्यात एके-५६ या मॉडेलच्या तीन रायफल आणि २४७ काडतुसे सापडली होती. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने तटरक्षक दल, दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर विभाग, नौसेना, कस्टम, सागरी सुरक्षा पोलिस दल यांनी याचा कसून तपास केला.

ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. यावर तिचा पती कॅप्टन जॉन ग्रेटविच इतर साथीदारांसह होता. ते २६ जून रोजी मस्कतवरून युरोपच्या दिशेने निघाले होते, पण ओमानजवळ आल्यावर नौकेचे इंजिन बंद पडले. त्यामुळे नौकेवरील कर्मचाऱ्यांना जवळ असलेल्या कोरियन नौदलाच्या नौकेवर नेण्यात आले. समुद्रात भरती असल्याने ही नौका किनाऱ्यावर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती दोन महिने समुद्रात भरकटत राहिली. १८ ऑगस्टला ती हरिहरेश्वरच्या किनाऱ्याजवळ आली.

नौकेवरील सर्व साहित्याची सविस्तर तपासणी करण्यात आली असून काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. या अनुषंगाने दहशतवादविरोधी पथकामार्फत मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीवरून या प्रकरणामागे दहशतवादाचा कोणताही हेतू दिसून येत नाही.

- अशोक दुधे, जिल्हा पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.