Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? 2-3 दिवसांत घेणार अंतिम निर्णय

Harshvardhan Patil Vidhan Sabha Election: भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
BJP leader Harshvardhan Patil
BJP leader Harshvardhan Patilesakal
Updated on

भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे. कारण त्यांनी विधानसभेबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळणार आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत. यात पाटील आणि पवार यांच्यात भेट झाल्याने यात भर पडली. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी ते अजूनही महायुतीतच असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीच्या नेत्यांशी बोलून दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे पाटील म्हणाले.

BJP leader Harshvardhan Patil
Vadhavan Port Ghol Fish: वाढवण पोर्टमुळे मोठा 'घोळ'! भारतातील सर्वात महागडा मासा होणार लुप्त? 15 हजार रुपये किलोच्या माशाची वैशिष्ट्ये

2014 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढले, तेव्हा राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांनी काँग्रेसच्या पाटलांचा पराभव केला. पुढे 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटली, त्यामुळे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली तरही त्यांच्या पदरी निराशा आली. आता अजित पवार यांची राष्ट्रावादी महायुतीत आल्याने ही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडे राहण्याची चिन्हे आहेत. अशात भाजपकडून संधी न मिळाल्यास पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचा पावित्रा घेतला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यावेळी इंदापूर विधानसभेची उमेदावारी मिळेल या आश्वसनावर त्यांनी महायुतीचा प्रचार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

BJP leader Harshvardhan Patil
Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराज पुतळा प्रकरण; स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला कोल्हापूरातून अटक, जयदीप आपटे अजूनही फरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.