"शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी चार्ज दिलाय का?"

भाजप आमदार राम कदम यांचा सवाल
Sharad Pawar - Ram Kadam
Sharad Pawar - Ram Kadam Team eSakal
Updated on

भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संघटनासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना टोला लगावला. मुख्यमंत्री पदाचा पदभार शरद पवार यांना दिला का असा सवाल उपस्थितीत केला. काल एसटी कर्मचारी संघटना बैठक शरद पवार आणि परिवहन मंत्री परब यांच्या उपस्थितीत झाली, पवार अशा बैठक कशा धेऊ शकतात तसच सीएम ठाकरे बैठकीस उपस्थितीत नव्हते , ठाकरे यांनी सीएम पदाचा पदभार पवार यांना दिला का असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे

Sharad Pawar - Ram Kadam
'सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे ST कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ'

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा प्रलंबित आहे. सरकारने घेतलेले निर्णय कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने अजूनही काही कर्मचारी कामावर रुजू झालेले नाही. त्याच पार्श्वभूमिवर हा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी करत एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पुन्हा एकदा कर्माचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं.

Sharad Pawar - Ram Kadam
ST STRIKE : 'न्याय मागण्याचा हक्क, मात्र कुणाला वेठीस धरू नका'

कालच्या बैठकीत शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी म्हटलंय की, माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा प्रवासी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेले दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, जे हाल झालेत, त्याचं वर्णन न केलेलं बरं. दुसऱ्या बाजूला कोरोनाचा नवा अवतार चिंतेत भर टाकतो आहे. याचा सगळ्याचा महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होतो आहे आणि असा परिणाम होत असताना सुद्धा परिवहन खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी जेवढं जास्त देता येईल तेवढा प्रयत्न केला. कृती समितीच्या सदस्यांचेही काही प्रश्न आहेत, काही कमतरता आहेत, हे कृती समितीने निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याही बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, हे करताना एसटी चालू झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी सेवेत आलं पाहिजे, अशी मागणी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()