हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर; सोमय्या आज दंड थोपटून पुण्यात

हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर; सोमय्या आज दंड थोपटून पुण्यात
Updated on

पुणे: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी ठरले आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांनी घोटाळे केले असल्याचा आरोप करत त्यांनी एकामागोमाग एक तक्रारींचा ससेमिरा लावला आहे. अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा चालवून आल्यानंतर त्यांनी आता हसन मुश्रीफ यांचा नंबर असेल असं म्हटलं होतं. त्यानुसार, आज शुक्रवारी किरीट सोमय्या पुण्याला जाणार असून, हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी ट्विट करुन सांगितलंय.

हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर; सोमय्या आज दंड थोपटून पुण्यात
'भारत-रशिया संबंधांमध्ये बदल व्हावेत, अशी इच्छा नाही, मात्र...'; अमेरिकेचं स्पष्टीकरण

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलंय की, हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हसन मुश्रीफ यांचे कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली. फसवणूक, शेल आणि बनावट कंपन्यासाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची मागणी केली आहे.

काल किरीट सोमय्यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, श्री हसन मुश्रीफ सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा कारवाई साठी माझा उद्या शुक्रवार १ एप्रिल रोजी पुणे दौरा असेल. दुपारी ४.३० वाजता आयकर आयुक्त इंवेस्टीगेशन पुणे आयकर सदन, सॅलिसबरी पार्क तर ५.३० वाजता रजिस्ट्रार ऑफ कंपनीस पुणे PCNTDA ग्रीन बिल्डिंग, आकुर्डी याठिकाणी असेन.

काय आहे मुश्रीफांवरील आरोप

ठाकरे सरकारचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याप्रकरणी सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रातील २७००० ग्राम पंचायतीचे TDS रिटर्न पुढच्या १० वर्षांपर्यंत जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी फाइल करणार आणि त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला दरवर्षी जवळपास ५०,००० रुपये द्यावे लागणार होते.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी माध्यमांसमोर हा विषय आणला होता. मुश्रीफ यांनी अपारदर्शकपणे १० मार्च २०२१ रोजी हे १० वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे सोमय्यांनी दिले होते. सप्टेंबर महिन्यात त्यांनी माहिती उघडकीस आणाली होती. जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली. परंतु हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांनी ही कंपनी ८ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. मागील ८ वर्षात या कंपनीला काहीच आवक नाही. तसेच सन २०१९-२० मध्येही कंपनीची उलाढाल शून्य होती. यानंतरही संबंधित कंपनीला कंत्राट दिल्याने सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.

हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर; सोमय्या आज दंड थोपटून पुण्यात
Gulabrao Patil: गुलाबराव पाटलांचे एसटी कामगारांबाबत ॲड. गुणरत्न सदावर्तेंना आवाहन

किरीट सोमय्यांचा इशारा

”हे सरकार ५० वर्षे चालू दे. पण महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया ५० दिवसांत सरळ होणार, असा इशारा सोमय्यांनी दिला. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आता कारवाया आणि न्यायालयीन आदेशाला गती आली आहे. पुढील ५० दिवसांत ‘डर्टी डझन’ एकतर जेल, बेल किंवा रुग्णालयात असतील. महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()