नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ३१ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. यादरम्यान वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना मुश्रीफ यांनी नांदेडमधील रुग्णालयातील परिस्थिती खरंच वाईट असल्याचे मान्य केलं आहे.
नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिस्थिती खरोखरच तशी वाईटच आहे. हे पाचशे बेडचं रुग्णालय आहे. येथे रोज ८०० ते १००० पेशन्ट येतात आणि चारशे ते पाचशे रुग्ण हे खाली झोपत आहेत. अवस्था अशी आहे की, येथे एनएमसी (नॅशनल मेडिकल कमीशन)च्या नॉर्मप्रणाणे आठ लहान मुलांच्या पेट्या आहेत, त्यात जास्तीत जास्त १६ मुलं ठेवता येतील. काल तिथं ६८ लहान मुलं होती, एका पेटीत चार मुलं झोपवली होती.
मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले की, आपल्याला मुलभूत सुविधा वाढवण्याची गरज आहे. रुग्णालयात स्वच्छता नाही. दुर्गंधी आहे. येथे स्वच्छतेसाठी टेंडर देण्याचे प्रयत्न झाले, पण युनियनची भांडणं आहेत. त्यामुळे येथे कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच बदल्या झाल्याने मॅन पावर कमी झाली आहे.
क्लास वन आणि क्लास टू या प्रोफेसर्सच्या जागा एमपीएससीच्या माध्यमातून भरतो, पण त्यांनी लवकर नाही भरल्या तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरतो. क्लास तीन त्या टीसीएस मार्फत पाच हजार परिक्षा घेतल्या होत्या त्याचा निकाल लागला आहे. ऑक्टोबर अखेर क्लास तीनची सर्व पदे भरली जातील. क्लास फोरची पदे काही आउटसोर्स करायची असून काही पदं जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत भरायची आहेत असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
औषधांचा तुटवडा नाही...
औषधांचा कुठलाही तुडवडा नसून जवळपास १० ते १२ कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळाले आहेत. तीस टक्के दीड लाख खर्च करण्याची परवानगी आधीच दिली आहे, त्यामध्ये परत १० टक्के वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे ४० टक्के औषधासाठी आणि उपकरणांसाठी हाफकिंनच्या परवानगीची गरज नाही. त्याला प्राधिकरणाच्या गरज नाही. ४० टक्के डीन स्वतः प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर खरेदी करू शकता असेही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
ज्या तक्रारी मिळाल्या त्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, ३१ मृत्यूचं ऑडिट करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या असून दोन ते तीन दिवसात अहवाल मिळेल अशी अपेक्षा असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.