'हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र' थीम जाहीर

'हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र' थीम जाहीर

Published on

नागपूर : यावर्षी ३१ मे रोजी तंबाखू नकार दिन (World No Tobacco Day) हा 'तंबाखू सोडण्याची वचनबद्धता आणि त्यासाठीचे शपथपत्र', या विषयावर आधारित आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे (Maharashtra Government) मोठ्या प्रमाणात 'हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र ' (# Tobacco Free Maharashtra) हीम राबवली जाणार आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी या दिवशी शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे. (Hashtag Tobacco Free Maharashtra theme announced by Maharashtra Government)

'हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र' थीम जाहीर
'ही भाजपची नौटंकी'; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

महाराष्ट्र विशेषतः विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तंबाखू सेवनामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येत ६० टक्के लोक तंबाखू सेवनामुळे मृत पावतात. २०३० पर्यंत ही संख्या ८० टक्के पर्यंत जाण्याचे भाकीत केले गेले आहे.

तंबाखू सेवनामुळे मधुमेह, कर्करोग , पक्षघात, उच्च रक्तदाब, अंधत्व, श्वसनाचे आजार होण्याचा धोका संभवतो. तसेच कोरोना होण्याचा धोका ही वाढतो. एक वर्षामध्ये हृदयरोग होण्याचा धोका निर्माण होतो. तंबाखू सेवन इतर आजार प्रमाणेच आहे . तुम्ही व्यसनाच्या आहारी गेले असल्यास व्यसनमुक्तीचा ध्यास घ्या.

'हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र' थीम जाहीर
उपराजधानी हादरली! दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण खून; लष्करीबागेतील थरार

तंबाखू पासून होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करा. तंबाखू सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-११-२३५६ या वर संपर्क करा,असे आवाहन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सर्वोपचार रूग्णालयाचे सदस्य देवेंद्र पातुरकर यांनी केले आहे.

(Hashtag Tobacco Free Maharashtra theme announced by Maharashtra Government)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()