आरोग्य विभाग परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

आत्तापर्यंत सहा जणांना अटक, आरोग्य विभागातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता
आरोग्य विभाग
आरोग्य विभागsakal
Updated on

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर पोचली आहे. या प्रकरणात आरोग्य विभागातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे. अटक केलेल्या आरोपींना परीक्षेच्या एक दिवस आगोदरच उत्तरपत्रिका मिळाली, त्यांनी त्यांच्या उमेदवारांकडून अक्षरशः संपुर्ण उत्तरपत्रिकाच पाठ करून घेतल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे.

संदीप शामराम गुत्तेकर (वय 38, रा. बीड रोड, औरंगाबाद) व प्रकाश मिसाळ (वय 40) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्‍टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. सहा हजार 191 पदांसाठी आठ लाख 66 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परीक्षा सुरू होण्यापुर्वीच काही व्यक्तींनी त्यांच्या फायद्यासाठी प्रश्‍नपत्रिकेतील 100 प्रश्‍नांपैकी तब्बल 92 प्रश्‍न व त्यांची लिखित स्वरुपातील उत्तरे असलेला माहिीचा पेपर फोडून तो समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केला होता. याप्रकरणी काही उमेदवारांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रवींद्र कारेगावकर यांनी याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

आरोग्य विभाग
अकरावीसाठी दोन लाख ९८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस.हाके यांच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषण करून औरंगाबाद येथून तत्काळ विजय मुऱ्हाडे (वय 29), अनिल गायकवाड यांना अटक केली. त्यानंतर पवन मुंडे व सुरेश जगताप यांनाही तत्काळ अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये गुत्तेकर व मिसाळ यांची नावे पुढे आली. त्यांनाही पोलिसांनी अटक केली.

...आणि उत्तरपत्रिका तोंडपाठ करून घेतली !

गुत्तेकर याची औरंगाबाद येथील बीड रोडवर "नवसुराज्य ट्रेनिंग ऍकॅडमी' नावाची संस्था आहे. तर मिसाळ हा नेव्हल डॉकयार्ड येथे खलाशी आहे. दोघांनाही 30 ऑक्‍टोबरला रात्री परीक्षेची प्रश्‍नपत्रिका व त्याची उत्तरे प्राप्त झाली. त्यानुसार, दोघांनी आपल्या 50 ते 60 उमेदवारांना बोलावून त्यांच्याकडून संपुर्ण पेपर व त्याची उत्तरे पाठ करून घेतली.

आरोग्य विभाग
अभियांत्रिकी प्रवेशासाठी हवेत ९० पेक्षा जास्त पर्सेंटाईल

...सहा लाख रुपयांपासून सुरू झाला "रेट'

गुत्तेकर व मिसाळ यांना प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी सहा लाख रुपये घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, सहा लाख रुपये व त्यावर त्यांचे 50 हजार रुपयांचे कमिशन असे प्रत्येक उमेदवारांकडून दोघांनी घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार, त्यांनी उमेदवारांना पैसे देण्याबाबत सुचनाही दिल्या होत्या.

..आणि मोठे मासे लागणार गळाला

पेपरफुटीच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. तर आणखी चार जणांना दोन दिवसात अटक होण्याची शक्‍यता आहे. असे असले तरीही पेपरफुडी प्रकरणाची साखळी असून त्यामध्ये आणखी बऱ्याच जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. तसेच या प्रकरणामध्ये आरोग्य विभागातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.