आरोग्य विभागाची परीक्षा MPSC कडून घेणे अशक्य : अजित पवार

परीक्षेबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

मुंबई : आरोग्य विभागासारखी (Health Exam Paper issue In maharashtra) एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून (MPSC) घेणे अशक्य आहे, असे मते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Chief MinisterAjit Pawar On Health Department Exam ) यांनी व्यक्त केले आहे. शासनाने निर्णय घेतला तर पारदर्शक काम केलं पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar
आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण : मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक

दुर्दैवाने राजेश टोपेंना (Maharashtra Health Minister Rajesh Tope) दोनदा परीक्षा पुढे ढकल्याव्या लागल्या आहेत. मात्र, या प्रकरण यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करु की, पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही, असा इशारादेखील अजित पवार यांनी यावेळी दिला.

आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होतेय. त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.