Tanaji Sawant: बाळासाहेब-वाजपेयींना मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली, सावंतांची आत्मस्तुती

तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू
Tanaji Sawant
Tanaji SawantEsakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं दिसुन येत आहे. तानाजी सावंत यांनी आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षाही वरचढ असल्याचं एकप्रकारे सांगितल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत बोलताना म्हणाले की, "ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली." असा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे एका कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी आत्मस्तुती केली आहे.

Tanaji Sawant
WHO चा मोठा निर्णय; लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या

तानाजी सावंत स्वतःची पाठ थोपटण्याच्या ओघात बरंच काही बोलून गेले. परंतु थेट बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या विद्यमान सरकारसह देशाच्या राजकारणातील दिग्गज असलेल्या व्यक्तिमत्त्वांशी तानाजी सावंत यांनी स्वतःची तुलना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे डॉ. तानाजी सावंत एकनाथ शिंदेंची शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप या तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांचा रोष ओढवून घेण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

Tanaji Sawant
‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुड न्यूज! एप्रिलमध्ये होणार ३० हजार शिक्षकांची भरती

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

"या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहित होतं, जे पटांगण आपण घेतलं होतं सभेसाठी, ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या वेळीही भरलं नाही, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही ते भरता आलं नव्हतं, अडवाणीजी यांनाही भरता आलं नव्हतं, आणि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करुन दाखवली" असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी पंढरपुरात आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.