Nanded Hospital Death: नांदेड प्रकरण ही, तर राज्य मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी : आरोग्यमंत्री डॉ. सावंत
Nanded Hospital Death : नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणावर विरोधक आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
मात्र, आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी नांदेड प्रकरणाची जबाबदारी झटकत नांदेडमध्ये जे घडले ती मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
तसेच संबंधित शासकीय रुग्णालय आरोग्य विभाग नाहीतर, वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असल्याचे स्पष्ट करत विभागाची औषध खरेदी रखडलेली नसल्याचे सांगत विरोधकांकडून गवगवा केला जात असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. (Health Minister Dr tanaji Sawant statement on nanded hospital death case news)
पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची (सीएचओ) दोनदिवसीय दुसऱ्या प्रादेशिक परिषदेस शुक्रवारी (ता. ६) नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. या वेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यात सहभागी झाले होते. परिषदेला मार्गदर्शन करताना डॉ. सावंत बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, की नांदेडमध्ये जे घडले ती मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे. संबंधित शासकीय रुग्णालय हे आरोग्य विभाग नव्हे, तर वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत आहे, हे लक्षात घ्यावे. राज्यात औषधांचा तुटवडा, टंचाई आहे, खरेदी रखडली असल्याची ओरड केली जात आहे. मात्र, राज्यात औषधांचा तुटवडा नाही. खरेदीही रखडलेली नाही.
याउलट राज्य शासनाने खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या माध्यमातून खरेदी प्रक्रिया राबविली जाणार आहे. औषध खरेदी वेळेत व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, तसे आदेशही काढण्यात आले आहेत.
नांदेड प्रकरणावर विरोधकांकडून राजकारण केले जात असून, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातून डॉक्टरांचे खच्चीकरण होत आहे. आरोग्य हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. येथे राजकारण अयोग्य असल्याचे सांगत लोकांच्या भावना भडकविण्याचे काम विरोधकांनी करू नये, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
अप्रत्यक्ष रोहित पवारांवर टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या आरोपांचाही मंत्री डॉ. सांवत यांनी समाचार घेतला. पवार यांचा थेट नामोल्लेख टाळत जागतिक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे तयार झालेत, त्यांना रुग्णालय कोणाच्या अखत्यारीत आहेत, हेच माहिती नाही. त्याचाच एक गट सरकारमध्ये सहभागी आहे. त्याचे त्यांना दुःख झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आरोप होत आहेत. मात्र, आपल्याला भान ठेवण्याची गरज आहे. काहीही झाले तरीही तानाजी सावंतमुळे झाले असे सांगत आहात. आपले नॉलेज वापरावे, असा टोला त्यांनी या वेळी लगावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.