Shivsena Mla Disqualification Case: अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी संपली! नेमकं काय घडलं? निर्णय कधी येणार?

The hearing of the disqualified MLA case is over! What exactly happened?
Shivsena Mla Disqualification Case
Shivsena Mla Disqualification CaseEsakal
Updated on

Shivsena Mla Disqualification Case: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्र प्रकरणी आजची सुनावणी संपली आहे. अडीच तासाच्या युक्तिवादानंतर सुनावणी संपली. ठाकरे गटाने तीन अर्ज दाखल केले होते त्या अर्जावर आज सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 20 (एकूण 40 पैकी) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सर्व 14 आमदारांसह दोन प्रतिस्पर्धी गटांतील 34 आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिका प्रलंबित आहेत.

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून हे गट निर्माण झाले. यामुळे शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा समावेश असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकार पडले.

Shivsena Mla Disqualification Case
Eknath Khadse : भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसेंना जामीन मंजूर

शिंदे गटाचे वकील काय म्हणाले?

शिंदे गटाचे वकील म्हणाले, सर्व आमदारांना वैयक्तिक बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याचिका एकत्र केल्या तर तो अधिकार राहणार नाही, असे आमचे म्हणणे आहे. आम्ही अध्यक्षांना सांगितलं की लवकर सुनावणी घ्यावी. याप्रकरणी २० तारखेपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. (latest marathi news)

आजचे तिन्ही अर्ज ठाकरे गटाचे होते. आम्ही अर्ज केले नाही. आमचं सर्व सहकार्य राहील. त्यांच्याच अर्जावर आज युक्तिवाद झाला. वेगवेगळ्या याचिकांमुळे विलंब होत आहे. प्रकरण लवकर निकाली काढायचं असेल तर ठाकरे गटाने ठरवावं, असे शिंदे गटाचे वकील म्हणाले. 

ठाकरे गटाची भूमिका काय?

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणाले, कायद्याचा किस पाडण्याचा प्रयत्न होत आहे. अपात्रतेची तलवार डोक्यावर ते टाळण्यासाठी वेळेचा उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरण पुढे ढकलण्यात येत आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी. तसेच अध्यक्षांनी सुद्धा आज दिसत होत. मात्र एकत्र सुनावणी का नकोय असं अध्यक्षांनी देखील विचारलं. मात्र अध्यक्ष लवकर निर्णय देतील नाहीत आम्हाला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मागणी करावी लागेल. 

Shivsena Mla Disqualification Case
Supriya Sule: 'अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास...', सुप्रिया सुळेंनी घातली देवेंद्र फडणवीस यांना अट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com