NCP Crisis: "पक्षाच्या विस्तारात अजित पवारांचा कुठलाही हातभार नाही"; देवदत्त कामतांचा निवडणूक आयोगात दावा

NCP Crisis
NCP Crisis
Updated on

NCP Crisis: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. शरद पवार गटाकडून आयुयोगात युक्तिवाद सुरु आहे. यावेळी देवदत्त कामत यांनी हा अध्यक्ष पदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला आहे, असा आरोप केला आहे.

2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आघाडी करत निवडणुकीला समोर गेले होते. यामध्ये 54 आणि 44 आमदार विजयी झाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. अजित पवार यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही किंवा भूमिका देखील राहीली नाही, असे शरद पवार गटाकडून देवदत्त कामत यांनी सांगितले.

NCP Crisis
Chandrashekhar Bawankule : भाजपला साथ म्हणजेच भारताला आत्मनिर्भर करणे : चंद्रशेखर बावनकुळे

आतापर्यंत शरद पवार हेच कायम राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनीच पक्षाचा विस्तार केला. ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही, असे देवदत्त कामत यांनी स्पष्टपण सांगितले.

सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला आहे, असे शरद पवार गटाने आयोगात म्हटले आहे.

ही पक्षाअंतर्गत फूट नाही. हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. अजित पवारांना पक्षातील सर्व सत्ता हवी आहे. त्यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी देखील नव्हती, असे देखील देवदत्त कामत यांनी शरद पवार गटाती बाजू मांडताना कोर्टात सांगितले.

NCP Crisis
NCP Crisis: "श्रीनिवास पाटील पितृतुल्य पण राजकीय लढाईत..."; सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगिलतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.