Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update sakal

Maharashtra Rain Update : कुठे उघडीप तर कुठे मुसळधार पाऊस? राज्यात आज पुण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

rain in maharashtra today marathi news update : देशात परतीच्या पावसाला सुरूवात झाल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता,
Published on

देशात परतीच्या पावसाला सुरूवात झाल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता, त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाने उघडीप घेतली आहे. पण पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज कुठे पाऊस होणार?

भारतीय हवामना विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित महराष्ट्रात बहुतेक ठिकाणी उघडीप असेल तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आजपासून पुढील ४८ तास कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच येथे हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update
Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

यासोबतच महानगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवसही या भागात पावसाची शक्यता आहे. उर्वरित ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra Rain Update
Viral Post : ही नेमकं करते तरी काय? महिलेने तीन तासात कमवले 4.4 लाख रुपये; तुफान व्हायरल होतोय स्क्रीनशॉट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.