Weather Update: छत्र्या रेनकोट तयार ठेवा...राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

४ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट
pune rain update pune district recorded 259 mm of rain velhe monsoon weather
pune rain update pune district recorded 259 mm of rain velhe monsoon weathersakal
Updated on

राज्याच्या काही भागात पावसाने मुसळधार हजेरी लावली. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापासून (16 सप्टेंबर)पासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार16 तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये आगामी 4 ते 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

pune rain update pune district recorded 259 mm of rain velhe monsoon weather
Weather Update : राज्यभरातील पावसाने पुन्हा घेतली विश्रांती? वाचा हवामान विभागाचा अंदाज

उद्या (16 सप्टेंबरला) पालघर, मुंबई आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

pune rain update pune district recorded 259 mm of rain velhe monsoon weather
Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं दमदार कमबॅक; कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, महाबळेश्वरला 88 मिलिमीटर पावसाची नोंद

हवामान विभागाने महाराष्ट्रातील परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडाऱ्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेडला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे आणि रायगड विभागालाही यलो अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर सतर्कतेचे आवाहनही केले आहे.

pune rain update pune district recorded 259 mm of rain velhe monsoon weather
Dam Update : पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश स्थिती! कोयनेसह 'या' प्रमुख धरणांतील सहा TMC पाणी घटलं; फटका बसण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.