Mumbai city soaked in heavy rain as thunderstorm warnings continue; Yellow alert declared.
Mumbai city soaked in heavy rain as thunderstorm warnings continue; Yellow alert declared. esakal

Rain Update: पुन्हा एकदा संकटाचा इशारा! शेतकऱ्यांनो काळजी घ्या.... मुंबईला यलो अलर्ट, पुण्यासह संपूर्ण राज्यात काय परिस्थिती?

Thunderstorms and Heavy Rain Predicted for Mumbai, Pune, and Other Regions in Maharashtra : हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईत गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, त्यामुळे शुक्रवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published on

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, मुंबईत गुरुवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही हवामानाच्या स्थितीत बदल दिसून येत आहेत, आणि पुढील काही दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

मुंबईकरांची पावसामुळे अडचण-

गुरुवारी अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईतील नागरिकांना कामावरून घरी जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. शहर आणि उपनगरात दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, ज्यामुळे वाहतूक मंदावली होती. हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहनांची हालचाल कमी झाली, परंतु रेल्वे वाहतूक सुरळीत राहिली.

हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईत गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, त्यामुळे शुक्रवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता-

पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः ९ आणि १० ऑक्टोबरला विदर्भातील ११ जिल्ह्यांत, तर १० आणि ११ ऑक्टोबरला खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर या १० जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात मात्र किरकोळ पावसाची शक्यता आहे, तर १४ ऑक्टोबरपासून हवामानात काहीशी उघडीप जाणवेल.

Mumbai city soaked in heavy rain as thunderstorm warnings continue; Yellow alert declared.
अग्रलेख : नीतिमूल्यांचा ‘ताज’

राज्यभरात पावसाचा अंदाज-

पुढील २४ तासांत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना एलो अलर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दोन समुद्रांमधून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे मुंबईसह कोकणात रविवार, १३ ऑक्टोबरपर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

विदर्भात हवामान कसे असेल?-

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आणि राज्यात येत्या १ ते २ दिवसांत पावसाची शक्यता आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण राज्यात हवामानाच्या बदलांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिक काढणीला आले असताना पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांसाठी हा संकटाचा इशारा आहे.

Mumbai city soaked in heavy rain as thunderstorm warnings continue; Yellow alert declared.
Sakal Podcast: 'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.