Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम

नवी मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. कालपासून रिमझिम पडणारा पाऊस आज मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. मध्य रेल्वेवर पावसाचा परिणाम झाला आहे. लोकल पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहेत.
Mumbai Rain Updates
Mumbai Rain Updates esakal
Updated on

मुंबईः मुंबई आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तीन दिवसांपूर्वी पावसामुळेच मुंबईची तुंबई झाली होती. सामान्य नागरिकांसह अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री, आमदारांना अडकून पडावं लागलं होतं. आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

गुरुवारी दिवसभर घेतलेल्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, भायखळा भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच वडाळा, सायन, दादर टिटीमध्ये पाऊस सुरु झाला असून पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain Updates
MLC Election: "काँग्रेसचे 4 आमदार क्रॉस व्होटिंग करणार," जयंत पाटलांच्या खळबळजनक विधानानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चिंतेत

नवी मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. कालपासून रिमझिम पडणारा पाऊस आज मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. मध्य रेल्वेवर पावसाचा परिणाम झाला आहे. लोकल पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहेत.

Mumbai Rain Updates
Nagpur Traffic : ...अन्यथा पोलिस उपायुक्तांच्या बदलीचे आदेश देऊ; वाहतूक कोंडीवरून शशिकांत सावंत यांना फटकारले

दुसरीकडे किंग सर्कल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किंग सर्कल भागात पाणीच पाणी झाले असून दादरकडून चेंबूरकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.