टाचदुखीचा त्रास वाढतोय, काय आहेत कारणे? टाचदुखीची लक्षणे कोणती, काय उपाय करावेत, जाणून घ्या...

दिवसेंदिवस टाच दुखण्याचे प्रमाण वाढत चालले असून बदलती जीवनशैली व चुकीच्या पादत्राणांचा वापर आदी कारणे महत्त्वपूर्ण ठरली आहेत. मात्र स्ट्रेचिंग व्यायामाचा अभाव असल्याने सध्या सर्व प्रकारच्या अस्थिरोग रुग्णालयात टाच दुखण्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहेत.
heel pain
heel painsakal
Updated on

सोलापूर : दिवसेंदिवस टाच दुखण्याचे प्रमाण वाढत चालले असून बदलती जीवनशैली व चुकीच्या पादत्राणांचा वापर आदी कारणे महत्त्वपूर्ण ठरली आहेत. मात्र स्ट्रेचिंग व्यायामाचा अभाव असल्याने सध्या सर्व प्रकारच्या अस्थिरोग रुग्णालयात टाच दुखण्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अचानक टाच दुखायला सुरवात होते. अन् ही वेदना थांबत नाही. अचानक टाचदुखी सुरु झाली. पण त्यावर कोणताच घरगुती उपाय करता येत नाही म्हणून दवाखान्यात जातात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार न केल्याने या आजाराचा त्रास अनेक वर्षे कायम राहू शकतो.

टाचदुखीची लक्षणे...

  • वजन उचलण्यासोबत वेदना वाढते

  • चालताना किंवा धावताना टाचेत वेदना

  • टाचेच्या आतील भागातून वेदनेचा अनुभव

  • पायात कडकपणा आणि मर्यादित हालचालीने वेदना

  • टाचेमध्ये वेदनेसह सूज

  • झोपेतून उठल्यानंतर सकाळी टाच दुखणे

  • --------------------------------------------------------------------

कशी होते टाचदुखी...

  • शरीराचे वजन वाढल्याने पायावरील भार होऊन टाचेत वेदना

  • अभियंते, प्राध्यापक, शिक्षक व कामगार हे मोठा कालावधी एकाच ठिकाणी उभे राहून काम केल्याने त्रास होतो

  • चुकीच्या पद्धतीची पादत्राणे घातल्याचा परिणाम म्हणून टाचदुखी होते

  • घरातील फरशी आरोग्यदायी नसेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून टाचदुखी होते

  • अतिशय थंड वस्तूच्या संपर्कात पाय असणे

  • -----------------------------------------------------------------------

काय उपाय करावेत...

  • पुरेसा कमानीचा आधार, गादी आणि योग्य मजबुती देणारी पादत्राणे वापरावीत

  • शारीरिक क्रिया कलाप करताना पायांना त्याचा सराव करण्यासाठी वेळ द्यावा

  • शरीराचे वजन योग्य व्यायामाने नियंत्रित करावे

  • वॉर्म-अप आणि कूलडाउन हे व्यायाम करावेत

  • स्ट्रेचींग म्हणजे ताण देणारे व्यायाम करावेत

  • मऊ पृष्ठभागांवर चालावे किंवा व्यायाम करावा

  • जीर्ण झालेली पादत्राणे बदलावीत

नियमित व्यायाम अन् चांगली जीवनशैली आवश्यक

टाचदुखीचा त्रास झाल्यास थेट डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. त्यानुसार त्यावर तीन आठवडे ते तीन महिन्यापर्यंत उपचार करून ते बरे केले जाऊ शकतात. नियमित व्यायाम अन् चांगली जीवनशैली प्रत्येकाने अंगीकारली तर त्याचा परिणाम चांगला मिळतो.

- डॉ. व्यंकटेश मेतन, अस्थिरोग तज्ज्ञ, सोलापूर

------------------------------------------------------------------------------------

डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत

जीवनशैलीतील काही चुकांमुळे टाचदुखीचा त्रास होतो. कडक पादत्राणे घालणे, थॉयरॉईडचा त्रास असणे किंवा पायाचे नियमित व्यायाम न करणे अशी कारणे असतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

- डॉ. सचिन कुलकर्णी, अस्थिरोग तज्ज्ञ जुळे सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.