औरंगाबाद: १० ते १५ जून दरम्यान केंद्र शासनाकडून म्युकर मायकोसीस रुग्णांच्या (mucormycosis cases) उपचारासाठी ९३७४ अँफोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा झाला. त्यापैकी ९२७८ इंजेक्शन वितरित करण्यात आले आहेत, तर ९६ इंजेक्शन शिल्लक असल्याचा अहवाल असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी गुरुवारी (ता. १७) औरंगाबाद खंडपीठात सादर केला. १२ जिल्ह्यात आतापर्यंत म्युकर मायोसीसचे एकूण २०२६ रुग्ण आढळले, त्यांच्यापैकी १०३३ रुग्णावर उपचार चालू आहे, ७८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १८४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठात सादर केली.
कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात कमी झाल्यानंतर म्युकर मायकोसीस बद्दल कोणीही विचार केला नाही. येथे सुपर स्पेशालिटी वॉर्ड, सोयी सुविधा आणि वैद्यकीय उपचाराची यंत्र सामग्री आहे. केवळ पूर्ण वेळ तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे गरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत, याकडे खासदार इम्तियाज जलील यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. कोरोनाची तिसरी लाट आली तर तिला तोंड देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची तयारी आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी रुग्णांना बाहेरून खाजगी रुग्णालयातून चाचण्या करावे लागत होते.
अशा प्रकारे खाजगी रुग्णालये वाढविण्यासाठी अप्रत्यक्ष मदत केली जात होती, असे ते म्हणाले. घाटी रुग्णालयातील सोई सुविधा आणि यंत्र सामग्री बाबत उपस्थित केलेल्या विषयावर स्वतंत्र जनहित याचिका दाखल करण्याची मुभा देत सुओमोटो जनहित याचिकेत खंडपीठाला त्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. आजच्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र ॲड सत्यजित बोरा यांनीही बाजू मांडली. पुढील सुनावणी २८ जून रोजी होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.