मुंबई : सिटी सहकारी बँक गैरव्यवहार (city cooperative bank scam) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (shivsena leader anandrao adsul) यांना दणका दिला आहे. अडसूळ यांनी ईडीचं समन्स रद्द करण्याची विनंती याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
बडनेरा मतदासंघाचे आमदार रवी राणा यांनी सिटी कोऑपरेटीव्ह बँकेतील घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली होती. आनंदराव अडसूळ हे सिटी सहकारी बँकेचे संचालक असताना बँकेत ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी बँकेच्या कर्ज वाटप आणि इतर व्यवहारात झालेल्या अनियमतेबाबत गुन्हा दाखल करुन, चौकशी केली होती. याच आधारावर ईडीने अडसूळ यांच्यावर मनी लाँडरीगचा गुन्हा दाखल करुन आनंदराव अडसूळ यांची चौकशी केली होती.
ईडीने आनंदराव अडसूळ यांना सप्टेंबर महिन्यात नोटीस पाठविली होती. मात्र, ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्यामुळे ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीचं समन्स रद्द करण्यात यावे, अशी याचिका अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, ईडीच्या कारवाईला आवाहन देणारी अडसूळ यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे आदेश न्यायालयाने अडसूळ यांना दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.