सदावर्तेंना HC चा दिलासा; पुण्यातील तक्रारीसाठी अटकपूर्व जामीन

सदावर्तेंविरोधात महाराष्ट्रातील विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदावर्ते
सदावर्तेसकाळ
Updated on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये न्यायालयाने सदावर्तेंना अटकपूर्व जामीन दिला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 2020 मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे. मात्र, कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना झाले आहेत. (High Court Grant Pre Arrest Bail To Gunaratna Sadavarte In Pune Case)

सदावर्ते
टेस्लाचे भारतात स्वागत; पण, "मेक इन चायना चालणार नाही : गडकरी

सदावर्तेंविरोधात महाराष्ट्रातील विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुण्यात दाखल एका गुन्ह्यामध्ये सदावर्तेंना हायकोर्टाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सदावर्तेंसाठी हा मोठा दिलासा मिळाल आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, त्यासाठी सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापूर कोर्टात दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.