राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये ऑफलाईन सुरु होणार- उदय सामंत

ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचेही निर्देश
Uday Samant
Uday Samantsakal
Updated on

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

Uday Samant
Sangli Crime News l बालविवाह प्रकरणी आटपाडीच्या 5 जणांना अटक

कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यापिठ कॅम्पस बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा विद्यापीठे, महाविद्यालये सुरु व्हावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान आज उदय सामंत यांनी याबाबत ट्विट करत निर्णय जाहीर केला आहे.

Summary

कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यापिठ कॅम्पस बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत.

Uday Samant
यशवंत जाधव प्रकरण: कॉर्पोरेट मंत्रालयाची मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार

ते म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) ३७ कोटी ५८ लाख ३३ हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.