नाशिक : महामार्गांवर वाढलेले अपघात ही जिल्ह्यात चिंतेची बाब बनली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर 1 हजार 363 अपघात झाले आहे. यातच आता शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील मागील साडेतीन वर्षांमध्ये एकूण 272 अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर होणारे अपघात नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि पोलिस महासंचालक यांच्यात बैठक झाली असून, यावर उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण हे राज्यात अधिक आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पोलिस प्रशासनास आवश्यक त्या सूचना दिल्या. यातच शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील अपघात होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.
जानेवारी २०१९ ते मे २०२२ या साडेतीन वर्षाच्या कालावधीत शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जात असलेल्या मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनवर २७२ अपघात झालेले आहे. यात ११२ अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२८ तर ३२ किरकोळ स्वरूपाचे अपघात आहे.
यामुळे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील अपघात कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि पोलिस महासंचालक यांच्यात एक बैठक झाली आहे. बैठकीत उपाययोजना करत त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.