Highway Accident : अपघातांसाठी कारणीभूत ठरतोय ‘हायवे हिप्नोसिस’ आजार; तज्ज्ञांनी सुचवले उपाय

Accident on Samriddhi Highway Chhatrapati Sambhajinagar
Accident on Samriddhi Highway Chhatrapati Sambhajinagaresakal
Updated on

सांगली : राष्ट्रीय व राज्यमार्गावर झालेल्या अपघातांत पंधरा दिवसांत ३० लोकांचा बळी गेला आहे. काल रात्री कळंबीत, आज सकाळी खरशिंग फाट्याला आणखी दोघांचा जीव गेला.

इतके अपघात का होत आहेत, या प्रश्‍नाच्या मुळाशी ‘हायवे हिप्नोसिस’ हाही एक मुख्य विषय असल्याचे मानसतज्ज्ञांचे मत आहे. वाहन चालवताना तंद्री लागणे हा आजार या मृत्यूंचे कारण ठरतोय. अशा वाहन चालकांनी स्वतःतील दोष वेळीच ओळखणे गरजेचे आहे, अन्यथा अपघातांची मालिका थांबणार नाही. (Latest Marathi News)

Accident on Samriddhi Highway Chhatrapati Sambhajinagar
Maharashtra Politics: "ठाकरे गटाचे उमेदवार आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढतील?"

रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग सध्या पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. याशिवाय, गुहागर-विजापूरसह अन्य राष्ट्रीय महामार्ग, दिघंची ते हेरवाड राज्यमार्ग आदी रस्ते सुसाट सुरू झाले आहेत. या रस्त्यावर अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे.

रोज बळी जात आहे. त्यात वाहनधारकांच्या असंख्य चुका कारणीभूत आहेतच, मात्र त्यातही ‘हायवे हिप्नोसिस’ हा गंभीर विषय असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

रस्ता खड्ड्यांचा असेल किंवा कच्चा, वाहनधारक अत्यंत सावधगिरीने वाहन चालवतो. पुढच्या पाच-सात फुटांत काय आहे, याबद्दल सावध असतो. त्याला त्या वेळी तंद्री लागण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. (Marathi Tajya Batmya)

Accident on Samriddhi Highway Chhatrapati Sambhajinagar
Raigad : ऐन शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावेळी रायगडावरील पाणीसाठ्यात घट; प्रशासनाला करावी लागणार...

राष्ट्रीय महामार्ग अत्यंत उत्तम दर्जाचे आहेत, तीनपदरी आहेत. वेग आपसूक येतो. समोर रस्ता रिकामा असतो. अशावेळी वाहनचालकाची सावधगिरी हरवते. तो विचारात गुंतू शकतो. हे गुंतणे, हरवून जाणे, तंद्री लागणे एका क्षणात होते, अशावेळी एखादे वाहन पुढे आले, तरीही त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचे भान राहत नाही.

अनेकदा तंद्रीतून बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळत नाही. ज्या रस्त्यावरून आपण जातोय, तिथे काही चुकीचे घडणार नाही, आडवे येणार नाही, असा अवाजवी विश्‍वास हेही एक कारण असते.

हा मानसिक धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे, अन्यथा विकासाचे हे राजमार्ग छोट्याशा मानसिक आजाराने मृत्युमार्ग बनायला वेळ लागणार नाही. दुर्दैवाने त्याची सुरवात झाली आहे.

Accident on Samriddhi Highway Chhatrapati Sambhajinagar
Bharat Gaurav Trains : भारत गौरव रेल्वेतर्फे उत्तर भारत सहल! 'या' कालावधीत पुणे येथून प्रारंभ

‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे तंद्री लागणे. जिथे-जिथे एकसुरीपणा येते, तिथे तंद्री लागते. देवासमोर ढोल वाजत असताना, आवाज घुमत असताना अनेक महिलांच्या अंगात येते. तो आवाज, माहोल यामुळे तंद्री लागून त्या एका वेगळ्या अवस्थेत जातात. त्यांच्या प्रतिक्रिया कमी होतात.

त्यामुळे त्यांच्याकडून काही अघटित होण्याची शक्यता वाढते. हेच रस्ते अपघातात होते. तंद्री लागणारे लोक खूप जास्त आहेत. वाहन चालवणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर तिला तंद्री लागण्याचे प्रमाण वाढते.

- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ

तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय

  • वाहनचालकाने आपणास ‘हायवे हिप्नोसिस’ असल्याचे लवकर ओळखावे

  • अचानक तंद्री लागणे आणि भानावर येणे, हे आपल्याबाबत एकदाही घडले तरी ती सूचना समजावी

  • प्रत्येक चालकाने ठराविक वेळाने वाहन थांबवून ब्रेक घ्यावा. चहा, कॉफी प्यावी.

  • वाहनातील चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीने चालकाशी बोलत राहावे.

  • त्याला भावनिक विश्‍वातून वास्तवात आणावे.

  • दारु पिल्यानंतर तंद्री अधिक लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()