Hingoli Yellow Rain: आश्चर्य! हिंगोलीत पडला पिवळा पाऊस; भलत्याच चर्चांना उधाण

Hingoli Yellow Rain Marathi News : स्थानिकांनी या प्रकाराची माहिती तातडीनं प्रशासनाला कळवली.
rain update Yellow Alert in North Maharashtra news
rain update Yellow Alert in North Maharashtra news
Updated on

Hingoli Yellow Rain: हिंगोलीमध्ये पिवळा पाऊस पडल्याची एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. यामुळं परिसरात भलतीच चर्चा रंगली होती. स्थानिकांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला कळवली, त्यानंतर प्रशासनानं याचा अभ्यास सुरु केला आहे.

rain update Yellow Alert in North Maharashtra news
Chhagan Bhujbal: आरक्षणप्रश्नी शरद पवार, CM शिंदेंमध्ये होणार चर्चा! भुजबळ-पवार बैठकीत नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावच्या शिवारात अचानक आकाशातून पिवळ्या रंगाचे थेंब कोसळत असल्याचं चित्र होतं. मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे पिवळ्या रंगाचं पाणी आणि थेंब कोसळत असल्यानं भलत्याच चर्चांना उधाणही आलं. ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिली, याची गंभीर दखल घेत प्रशासनानं याचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं.

rain update Yellow Alert in North Maharashtra news
Pankaja Munde : "आता बस्स! मला साधी विधानपरिषद मिळाली तर..."; पंकजा मुंडे का भडकल्या?

दरम्यान, हा पिवळा पाऊस म्हणजे केमिकलयुक्त पाऊस असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. कारण अशा प्रकारचा पिवळा आणि काळ्या रंगाचे पावसाचे थेंब आकाशातून पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

रंगीत पावसाचे थेंब हे प्रदुषणामुळं तयार होतात. विशिष्ट प्रदुषित हवेशी ढगांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याशी संपर्क झाल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि आपल्याला अशा प्रकारे विविध रंगांमध्ये पावसाचे थेंब पडत असल्याचा भास होतो. पण प्रशासनानं हिंगोलीतील या प्रकाराचा सखोल अभ्यास केल्यानंतरच नेमका हा प्रकार काय आहे? हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.