Hirkani Bus Accident: ब्रेक फेल झाल्याने हिरकणी बस पलटली; 40 विद्यार्थी जखमी

Hirkani Bus Accident Palghar: पालघरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी हिरकणी बस पलटल्याची माहिती समोर आहे. यामध्ये सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Bus accident
Bus accident esakal
Updated on

पालघरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी हिरकणी बस पलटल्याची माहिती समोर आहे. यामध्ये सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातानंतर सर्व जखमींना वाडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बसचे ब्रेक फेल असल्याचे माहिती असूनही प्रवास सुरू होता. त्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

पालघरमधील वाडा बसस्थानकातून ही हिरकणी बस आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. बस वाड्याहून आमगावकडे जाताना कुमदल या गावापाशी चढ चढत असताना बस बंद पडली व मागे सरकू लागली.

यावेळी बस चालकाने ब्रेकने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. यामुळे बस मागे उताराला आल्याने पलटी झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.