Holiday 2024 : नवीन वर्षातील सुट्या जाहीर झाल्याने जोडून आलेल्या, हुकलेल्या व सोयीच्या-गैरसोयीच्या सुट्या किती याची उत्सुकता संपली आहे. २०२४ मध्ये धार्मिक व राष्ट्रीय सणांच्या २५ सुट्या असतील. त्यात शनिवार व रविवारला जोडून ९ सुट्या आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुषखबर मानली जात आहे. नव्या वर्षात पाच सुट्या शनिवार-रविवारी असल्याचे दुःख असेल. सर्व सुट्ट्या मिळून सुट्यांटे शतक वर्षभरात नोकरदार पूर्ण करतील.
पुढच्या वर्षात किती आणि कधी सार्वजनिक सुट्या मिळणार? याबाबत सर्वांना उत्सुकता असते. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी, शिक्षक, बँक कर्मचारी यांचे डोळे सुट्यांच्या यादीकडे असतात.
२०२३ संपण्यास जवळपास ४१ दिवस शिल्लक असताना राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर केली. (holidays in 2024 9 holidays including Saturday and Sunday in new year news)
नव्या वर्षात सार्वजनिक व रविवारच्या मिळून ७४ सुट्या मिळणार आहेत. दुसरा व चौथा शनिवार मिळून सुट्यांचे दिवस शंभरवर होईल. गोपाळकाला व अनंत चतुर्दशीची सुटी देण्याचा निर्णय घेतल्यास अजून दोन सुट्यांची भर पडणार आहे.
रविवारी आल्यात सरकारी सुट्या
सरकारी सुट्यांप्रमाणे रविवार आणि शनिवारच्या सुट्या हव्याहव्याश्या असतात. मात्र पुढील वर्षात ५ सुट्ट्या शनिवार, रविवारी येत असल्याने या सुट्यांवर पाणी फिरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी बलिप्रतिपदा व भाऊबीज या सुट्यांचा समावेश आहे.
त्यामुळे या स्वंतत्र सुट्यांचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. राज्य सरकारने ३ नोव्हेंबरला भाऊबीजेची अतिरिक्त सुटी जाहीर केली आहे, परंतु त्यादिवशी रविवार असल्याने ती सुटी स्वतंत्रपणे मिळणार नाही.
लगतच्या सुट्यांची मेजवानी
आनंदाची बाब म्हणजे, शनिवार-रविवारला जोडून शुक्रवारी अथवा सोमवारी सुटीचा प्रसंग ९ वेळेस येत आहे. या लगतच्या बोनस सुट्यांची मेजवानी मिळणार आहे. अशा सुटीला ‘वीकेण्ड' नियोजन करण्याची संधी नोकरदारांना मिळणार आहे. रविवारला जोडून शुक्रवारी अथवा शनिवारी तसेच सोमवारी अथवा मंगळवारी सुटी आल्यावर सर्वाधिक आनंद नोकरदारांना होतो. कारण या सुट्या पाहून फिरण्याचे, कार्यक्रमांचे नियोजन आखले जाते.
अशा लगतच्या सुटी सहा वेळेस आल्या आहेत. नवीन वर्षातील पहिली प्रजासत्ताक दिनाची २६ जानेवारीची सुटी शुक्रवारी आल्याने शनिवारी, रविवारी सलग तीन दिवसांचा लाभ मिळणार आहे. सोमवारी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुटी असून लागून शनिवार व रविवार सुटी आहे.
महाशिवरात्री (शुक्रवार, ८ मार्च), होळी (सोमवार, २५ मार्च), गुडफ्रायडे (शुक्रवार, २९ मार्च), बकरी ईद (सोमवार, १७ जून), ईद ए मिलाद (सोमवार, १६ सप्टेंबर), दिवाळी लक्ष्मीपूजन (शुक्रवार, १ नोव्हेंबर) आणि गुरुनानक जयंती (शुक्रवार, १५ नोव्हेंबर) या सुट्या शनिवार व रविवारला जोडून आल्याने असतील.
अशा आहेत सार्वजनिक सुट्या
नव्या वर्षासाठी सरकारने २५ सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या आहेत. त्या अशा : प्रजासत्ताक दिन (शुक्रवार, २६ जानेवारी), छत्रपती शिवाजी महाराज जयंती (सोमवार, १९ फेब्रुवारी), महाशिवरात्री (शुक्रवार, ८ मार्च), होळी (सोमवार २५ मार्च), गुड फ्रायडे (शुक्रवार, २९ मार्च), गुढीपाडवा (मंगळवार, ९ एप्रिल), रमझान ईद (गुरुवार, ११ एप्रिल), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (रविवार, १४ एप्रिल), रामनवमी (बुधवार, १७ एप्रिल), महावीर जयंती (रविवार, २१ एप्रिल), महाराष्ट्र दिन (बुधवार, १ मे), बुद्ध पौर्णिमा (गुरुवार, २३ मे), बकरी ईद (सोमवार, १७ जून), मोहरम (बुधवार, १७ जुलै), स्वातंत्र्यदिन (गुरुवार, १५ ऑगस्ट), पारशी नववर्ष दिन (गुरुवार, १५ऑगस्ट), गणेश चतुर्थी (शनिवार, ७ सप्टेंबर), ईद-ए-मिलाद (सोमवार, १६ सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (बुधवार, २ ऑक्टोबर), दसरा (शनिवार, १२ ऑक्टोबर), दिवाळी अमावस्या (शुक्रवार, १ नोव्हेंबर), बलिप्रतिपदा (शनिवार, २ नोव्हेंबर), भाऊबीज (रविवार, ३ नोव्हेंबर), गुरुनानक जयंती (शुक्रवार, १५ नोव्हेंबर), ख्रिसमस (बुधवार, २५ डिसेंबर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.