मुंबई: माजी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना एकनाथ खडसे, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी शिंदे फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
कुलाबा पोलिस स्टेशन येथे काही राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यासंदर्भात आरोपत्र देखील दाखल करण्यासाठी गृहविभागाकडे परवानगीचे पत्र पाठवण्यात आले होते, दरम्यान गृह विभागाने ही परवानगी नाकारली आहे. पुढे पोलिस कोर्टात आहवाल सादर करणार आणि पोलिस आरोपपत्र मागे घेण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं, त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या त्यानंतर त्यांच्यावरील ही केस बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले होते. ज्या दिवशी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.