Ashadhi Wari : बाजीराव विहीर येथे अश्व रिंगण सोहळा

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले.
Ashadhi Wari
Ashadhi Wari sakal
Updated on

मोहन कोळी : सकाळ वृत्तसेवा

बाजीराव विहीर, वाखरी, ता. १५ :

तुझा पाहूनी सोहळा,

माझा रंगला अभंग ।।

गेला शिणवटा सारा,

मेघ झाले पांडुरंग ।।

नाम तुकोबाचे घेता,

डोले पताका डौलात ।।

अश्व धावता रिंगणी,

नाचे विठू काळजात ।।

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठूनामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना आबालवृद्धांचे भान हरपले.

भंडीशेगावमधील मुक्काम अटोपून वाखरीकडे निघालेल्या माऊलींच्या पालखीचे चौथे गोल रिंगण सोमवारी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाले. पालखी बाजीराव विहिरीवर आल्यानंतर पालखी खांद्यावर घेऊन गोल रिंगणासाठी शेजारील मोकळ्या मैदानात नेण्यात आली. येथे पालखी सोहळ्याचे चौथे अखेरचे गोल रिंगण सोहळा सायंकाळी साडे पाचच्या सुमारास रंगला.

बाजीराव विहीर परिसरात वारकऱ्यांनी सोहळ्यात सहभाग घेतला. बाजीराव विहीर परिसरात वारकरी विविध खेळ खेळण्यात रंगले. यात सुरपाट्या, कबड्डी, खो-खो, फुगडी, खेळण्याचा आनंदही लुटण्यात आला. शीण गेला, भाग गेला या उक्तीप्रमाणे चालून चालून थकलेले वारकरी विठूरायाचे दर्शन घेण्यास ताजेतवाने झाले.

उद्या (मंगळवारी) वाखरी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे शेवटचे मोठे उभे रिंगण होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.