रावसाहेब दानवेंनी वडा पाव खाल्ला, पैसे दिले की नाही? बिलाच्या पावतीचा फोटो Viral

रेल्वे मंत्री दानवे ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेले आणि तेथे त्यांनी वडा आणि भजीपाववर ताव मारला.
रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवेईसकाळ
Updated on
Summary

रेल्वे मंत्री दानवे ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेले आणि तेथे त्यांनी वडा आणि भजीपाववर ताव मारला.

सध्या राज्यातील राजकीय वातावरण आरोपप्रत्यरोपांमुळे गढूळ झाले आहे. यादरम्यान, एक वेगळी बातमी समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State for Railways Raosaheb Danve ), इतर मंत्री, आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यात एका हॉटेलमध्ये जाऊन वडा पाव, भजी पाववर ताव मारला असल्याची बातमी मिळाली होती. चहा, नाश्ता झाल्यानंतर हॉटेलचे बिल (Bill) न देता मंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघून गेल्याने चर्चेला उधाण आले होते. मात्र आता ते बिल दिले असल्याची माहिती मिळत आहे.

घडलेली घटना अशी, रेल्वे मंत्री दानवे ठाण्यातील (Thane) एका हॉटेलमध्ये गेले आणि तेथे त्यांनी वडा आणि भजीपाववर ताव मारला. नाश्ता करताना हे सगळे अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले. मात्र चहा, नाश्ता झाल्यानंतर हॉटेलचे बिल न देता मंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघून गेले. शेकडो वडापाव आणि अनेक प्लेट भज्यांवर मारला तावठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याच्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली होती. मात्र या बातमीनंतर आता त्यांनी ते बिल भरले आहे.

रावसाहेब दानवे
झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा; शिवनेरीवर शिवजन्म सोहळा उत्साहात

आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेकांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला. त्यानंतर ठाणे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर वडा पाव वर ताव मारला. मात्र शेकडो वडापाव आणि अनेक भजी प्लेट खाल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते बिल न देताच निघून गेले आहेत. त्यामुळे या घटनेची चर्चा चांगलीच रंगली होती.

दरम्यान, रेल्वे प्रवास करून घेतल्या अडचणी जाणूनरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकल प्रवास करून प्रवाश्यांशी चर्चा देखील केली. त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या आणि लवकरात लवकर अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

रावसाहेब दानवे
Jammu Kashmir : शोपियानमध्ये मोठी चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.